Last Updated: Monday, April 22, 2013, 16:46
www.24taas.com, मुंबईशकील नुरानी धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला अंधेरी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी अंधेरी कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल होतं.
त्यानंतर संजय आज कोर्टात हजर झाला, आणि त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 2002 साली शकील नुरानी यांचा सिनेमा अर्धवट सोडल्याप्रकरणी अंधेरी कोर्टात आज सुनावणी होती..
मात्र समन्स बजावल्यानंतरही सुरुवातीला संजय दत्त कोर्टात हजर नव्हता, त्यामुळं कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं होतं.
First Published: Monday, April 22, 2013, 16:46