Last Updated: Monday, November 11, 2013, 22:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहिंदी-मराठी चित्रपटांमध्ये पोलिसांची छबी चुकीची रंगवली जात असल्याचं मुंबई पोलिसांचं मत बनलंय. ही बाब कलाकार-निर्माता-दिग्दर्शकांच्या कानावर घालण्यासाठी आज अंधेरीत एक बैठक झाली.
मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी तसंच अभिनेता अजय देवगण, निर्माते सलीम खान, मुकेश भट, गीतकार जावेद अख्तर, मराठी निर्माते महेश कोठारे, सचिन पिळगावकर आदी या बैठकीला उपस्थित होते.
यात मुंबई पोलिसांची प्रतिमा चांगलीच रंगवली जाईल, असं आश्वासन या कलाकारांकडून देण्यात आलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Monday, November 11, 2013, 21:33