मल्लिकासाठी परफेक्ट बॅचलर ‘नरेंद्र मोदी’!, Narendra Modi is most eligible bachelor: Mallika Sherawat

मल्लिकासाठी परफेक्ट बॅचलर ‘नरेंद्र मोदी’!

मल्लिकासाठी परफेक्ट बॅचलर ‘नरेंद्र मोदी’!
www.24taas.com, झी मीडिया, उदयपूर

आपल्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका शेरावत आता बऱ्याच दिवसानंतर एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मल्लिकाच्या म्हणण्यानुसार, ६२ वर्षीय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आजच्या घडीला देशातील सगळ्यात परफेक्ट बॅचलर आहेत.

‘द बॅचलरेट इंडिया – मेरे ख्यालों की मल्लिका’ या कार्यक्रमातून मल्लिका शेरावत लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. आपल्यासाठी योग्य जीवनाचा जोडीदार ती या कार्यक्रमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी तिला ‘तिच्यासाठी सध्याचा परफेक्ट बॅचलर कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिनं जे उत्तर दिलं त्यानं अनेकांना चक्रावून टाकलं. मल्लिकाच्या मते, सध्या नरेंद्र मोदी हेच सगळ्यात परफेक्ट बॅचलर आहेत... याचं कारण स्पष्ट करताना मल्लिका म्हणते, ‘नरेंद्र मोदी गतीशील आहेत... प्रगतीशील विचारांचे आहेत आणि माझ्यासारखीच त्यांच्याही बाबतीत लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीचा समज आहे’. ३६ वर्षीय मल्लिकानं ही गोष्ट आपल्या आगामी कार्यक्रमाच्या प्रमोशनच्यावेळी म्हटलीय.

‘द बॅचलरेट इंडिया – मेरे ख्यालों की मल्लिका’ या कार्यक्रमाच्या प्रचारादरम्यान मल्लिका खुपच उत्साहीत होती. आकर्षक गाऊनमध्ये ती आणखीनच आकर्षक दिसत होती. या कार्यक्रमाचं आयोजन फतेहगढ किल्ल्यात (आता सध्या याचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय) करण्यात आलं होतं.

मल्लिकाच्या या रिअॅलिटी शो ‘द बॅचलर’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाशी मिळता जुळता असणार आहे. यामध्ये ३० अविवाहीत तरुणांमधून मल्लिकासाठी एक योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या लॉन्चिंग दरम्यान अभिनेता रोहित रॉयदेखील उपस्थित होता. रोहीत या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असेल. सात ऑक्टोबरपासून हा कार्यक्रमा लाईफ ओके या चॅनलवर पाहायला मिळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 7, 2013, 23:14


comments powered by Disqus