मोदींच्या शपथविधीला अमिताभ, सलमान, रजनी, Narendra Modi’s oath taking ceremony?

मोदींच्या शपथविधीला अमिताभ, सलमान, रजनी

मोदींच्या शपथविधीला अमिताभ, सलमान, रजनी

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात बऱ्याच बॉलिवुडच्या ताऱ्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यात अमिताभ बच्चन, सलीम खान, सलमान खान, रजनीकांत, विवेक ओबेरॉय, लता मंगेशकर यांचा समावेश आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आमंत्रण देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातचे ब्रँड अँबेसेडर झाले होते. अमिताभ बच्चन यांनी जाहिराताच्या माध्यमातून गुजराजच्या पर्यटनाला चालना दिली होती. अमिताभ बच्चन यांनी कधी खुलेआम मोदींचे समर्थन केले नाही, पण त्यांना मोदींचा प्रशंसक मानले जाते.

सलमान खानने अनेकवेळा मोदींची स्तुती केली होती. सलमान खानचे वडिल सलीम खान मोदींचे प्रशंसक आहे. या वर्षी जानेवारीत सलमानने अहमदाबादमध्ये मोदींची भेट घेतली होती.

सलमानने मोदींसह लंच केला होता. सलमान खान अहमदाबादमध्ये मोदींसह पतंग उडवली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मोदी यांच्यावर उर्दु वेबसाईट लॉन्च केली होती. दुसरीकडे लता मंगेशकरही मोदींच्या प्रशंसक आहेत. गेल्या काही कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले होते.

दाक्षिणात्य चित्रपटाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याशीही लोकसभा निवडणुकांदरम्यान मोदी यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी रजनीकांत यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या होते.

नरेंद्र मोदी २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कॅबिनेट मंत्र्यांसह शपथ घेणार आहे.. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. समारंभात तीन हजार पाहुण्यांना बोलविले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 23, 2014, 12:06


comments powered by Disqus