नेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते..., neha Dhupia say`s sex always sell

नेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते...

नेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते...
www.24taas.com, मुंबई

नेहा धुपिया आपल्या हॉट अदांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या वक्तव्यावरून देखील चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहा धुपिया आगामी `रश` या सिनेमाद्वारे आपल्या भेटीला येत आहे. आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नेहाने तिची सहकलाकार सागरिका घाटगेबरोबर नुकतीच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली.

काही वर्षांपूर्वी नेहाने एसआरके आणि सेक्सला नेहमीच मागणी असते, असे वक्तव्य केले होते. याविषयी नेहाला विचारले असता, ती आजही आपल्या या वक्तव्यावर ठाम दिसली. नेहा म्हणाली की, "काही वर्षांपूर्वी मी हे बोलले होते आणि आजसुद्धा मी माझ्या या वक्तव्यावर ठाम आहे.

सेक्स आणि एसआरकेला आजही महत्त्व आहे. एसआरके अर्थातच शाहरुखचे चित्रपट आजही चालतात. सेक्सबद्दल बोलायचे झाल्यास इमरान हाश्मीच्या चित्रपटांकडे बघा. बोल्ड दृश्यांमुळे त्याचे चित्रपटही चांगला बिझनेस करतात."


First Published: Wednesday, October 24, 2012, 13:58


comments powered by Disqus