सलमान खानची नवी मैत्रीण... डेझी शहा New friend of Salman Khan- Daisy Shah

सलमान खानची नवी मैत्रीण... डेझी शाह

सलमान खानची नवी मैत्रीण... डेझी शाह
www.24taas.com, मुंबई

सलमान खानची कृपादृष्टी ज्या मुलीवर पडते तिचं नशिब सलमान खान बदलून टाकतो, असं बॉलिवूडध्ये म्हटलं जातं. सलमान खानने बॉलिवूडला अनेक नट्या दिल्या आहेत. कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा यांना सलमाननेच स्टारडम मिळवून दिलं. आता सलमान खान दक्षिणेतली अभिनेत्री डेझी शाह हिच्यावर फिदा झाला आहे. तिला आपल्या आगामी मेंटल सिनेमात हिरोइन म्हणून सलमानने संधी दिली आहे.

मुख्य म्हणजे सलमान खानला यापूर्वी डेझी शाहने चक्क नकार दिला होता. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याची शिष्या असणाऱ्या डेझीला सलमान खानने बॉडीगार्ड सिनेमात करीना कपूरच्या मैत्रिणीच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. सिनेमात करीनाची ही मैत्रीण फसवणूक करून सलमानशी लग्न करते, अशी कथा या सिनेमाची होती. मात्र गणेश आचार्यने डेझीला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे डेझीने सलमानला नकार दिला.


खरंतर सलमानला नकार देणाऱ्या व्यक्तीला सलमान कधीच माफ करत नाही, हे सगळ्यांना माहित आहे. णात्र डेझीच्या बाबतीत कमालच झाली. डेझीने नकार देऊनही सलमानने पुढच्या सिनेमात तिला प्रमुख भूमिका दिली. या ऑफरला डेझीने होकार दिला. सध्या या सिनेमाचं शुटिंग लवासा सिटीमध्ये चालू आहे. सलमान सेटवर डेझीची खूपच काळजी घेत असल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. सलमानचा वरदहस्त लाभल्यामुळे डेझी की तो निकल पडी....

First Published: Thursday, May 2, 2013, 16:22


comments powered by Disqus