Last Updated: Wednesday, August 14, 2013, 19:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफिल्म ‘धूम ३’ चं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हे ‘धूम ३’चं पहिलंच मोशन पोस्टर असून हे १ मिनिटभराचं आहे.या आधीच्या पोस्टरमध्ये फक्त आमिर खानचा चेहरा दाखवला होता. त्याचा अर्धा चेहरा टॅटूने सजवलेला पहिल्या लूकमध्ये दिसला होता.
नव्या पोस्टरमध्ये आमिर खान पाठमोरा दिसत आहे. पाठ पाहूनही तो आमिर खानच असल्याचं सहज लक्षात येतंय. तसंच या पोस्टरवर लिहिलं आहे, की या वर्षाचा शेवट धमाकेदार होणार आहे.
या सिनेमात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. ‘धूम ३’ हा सिनेमा २००४ मध्ये आलेल्या धूमचा तिसरा भाग आहे. पहिल्या सिनेमात जॉन आब्रहम खलनायकाच्या भूमिकेत होता. तर दुसऱ्या भागात हृतिक रोशन खलनायक होता. दोन्ही भागांप्रमाणेच तिसऱ्या भागातही अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात कतरिना कैफही आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 14, 2013, 19:54