नववर्षाचं स्वागत कसे करतायत बॉलिवूड स्टार्स, पाहा..., new year celebration of Bollywood stars

नववर्षाचं स्वागत कसे करतायत बॉलिवूड स्टार्स, पाहा...

नववर्षाचं स्वागत कसे करतायत बॉलिवूड स्टार्स, पाहा...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची यंदाच्या वर्षाची सुरुवात अनेक रमणीय स्थळांवर होणार आहे... तर काही जण नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमधून करणार आहेत. सुपरस्टार शाहरुख खान थायलंडमध्ये आपल्या कुटुंबीयांसहीत नव्या वर्षाचं स्वागत करतोय. तर सध्या ‘धूम ३’च्या यशाच्या पावसात ओलाचिंब झालेला आमिर खान पंचगणीमध्ये आपल्या कुटुंबीयांसहीत सुट्ट्या व्यतीत करणार आहे.

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आपल्या कुटुंबीयांसहीत आणि मित्रासहीत आपल्या पनवेलस्थित फार्महाऊसवर जाण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या राय आणि चिमुरड्या आराध्यासहीत नव्या वर्षात दुबईमध्ये असेल.
सध्या, पॅरोल मिळवून तुरुंगातून तात्पुरती रजा मिळवणारा संजय दत्त आपल्या कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचं स्वागत करणार आहे. यंदाच्या वर्षात चार सुपरहिट सिनेमे देऊन बॉलिवूड नंबर वन हिरोईन बनलेली दीपिका पादूकोण बहुतेककरून आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईतच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.

बऱ्याच कालावधीनंतर ‘आर... राजकुमार’मधून यशाची पायरी चढलेला शाहिद कपूर आपल्या मित्रांसमवेत लॉस एंजिल्समध्ये नव्या वर्षाचं स्वागत करणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर गोव्यात आपल्या मित्र-मंडळींसोबत सेलिब्रेशन करतेय तर रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नव्या वर्षात न्यूयॉर्कमध्ये असणार आहेत.

अक्षय कुमार सहपरिवार यूरोपमध्ये असेल. सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करतील. अभिनेत्री माधुरी दीक्षित सिंगापूरमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. प्रियांका चोप्रा चेन्नईमध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम सादर करणार आहे तर मल्लिका शेरावत टोरंटोमध्ये नववर्षाच्या एका सोहळ्यात सहभागी होणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 10:07


comments powered by Disqus