Last Updated: Monday, January 13, 2014, 07:37
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘टाईमपास’ सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात चांगलाच यशस्वी ठरलाय. पण, याच सिनेमावर वृत्तपत्र विक्रेते मात्र नाराज आहेत. या सिनेमात वृत्तपत्र विक्रेत्यांबाबत वापरल्या गेलेल्या मानहाणीकारक शब्दांमुळे ते या सिनेमाविरोधात उभे ठाकले आहेत.
‘टाईमपास’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय. अन्यथा वृत्तपत्र विक्रेता संघ तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिलाय. या संदर्भात नुकतीच, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत, पावसात किंवा कोणत्याही दिवसांत वृत्तपत्र विक्रेते घरोघरी वृत्तपत्र पोहचवण्याचं काम करतात... हे काही हलक्या दर्जाचं काम नाही, असं त्यांनी म्हटलंय. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता फेडरेशनचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण यांनीही पाठिंबा दिला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 12, 2014, 16:00