Last Updated: Wednesday, October 30, 2013, 11:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आपण सारेच आपल्या फेवरेट सेलिब्रीटींना कॉपी करत असतो. त्यात बिग बींच्या सर्वच गोष्टी जरा हटके असतात. अमिताभ बच्चन मराठी शिकत आहेत हे आपल्या सर्वांनाच ठाउक आहे. त्यामुळं सिनेसृष्टीतील इतर मंडळींनाही आपण मराठी भाषा शिकायला हवी, याची जाणीव झाली आहे. एका कार्यक्रमात अमिताभ यांनी मराठीत भाषण करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं तिथं उपस्थित असलेले सुभाष घईंनाही आपल्या मराठी भाषेच्या अज्ञानाची कबुली द्यावी लागली.
संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या नावानं देण्यात येणारा हृदयनाथ पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. कार्यक्रमात त्यांचं स्वागत करताना हृदयनाथ मंगेशकर म्हणले,“मी मराठीतचं बोलणार असल्याचं स्पष्ट केलं. माझी हिंदी भाषा अमिताभ यांसारखी चांगली नाही, याउलच माझं हिंदी ऐकूण त्यांचं हिंदी बिघडेल याची धास्ती मला जास्त आहे. कदाचीत माझं मराठी ऐकूण, त्यांचं मराठी सुधारेल अशी आशा मी व्यक्त करतो”.
त्यांचं हे वक्तव्य लक्षात घेउन, बच्चन भाषणास उभे राहीले. “आपली ही हिंदी भाषा इतकी उच्च दर्जाची नाही, पण मी मराठी भाषा शिकतं आहे”, असं बच्चन यांनी सांगितलं. “शिकण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळं आता अर्धवट मराठी बोलणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं मला माफ करावं. यापुढं जेव्हा कधी अशा जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मला मिळेल, तेव्हा नक्कीचं मी मराठीतून भाषण करीन”, असं आश्वासन बच्चन यांनी दिलं. त्यानंतर, याच कार्यक्रमात “माझी पत्नी पुण्यातली असूनही, मला मराठी येत नाही, पण लवकरचं मीही मराठी शिकून घेईन, असं सुभाष घईंनी कबुल केलं.
हिंदी सिनेसृष्टित अक्षय कुमारला उत्तम मराठी बोलता येतं. आमिर खाननं सुद्धा मराठी भाषेचे धडे गिरविले आहेत. देसी गर्ल प्रियंका चोप्रा, नवाझुद्दीन सिद्दिकी, इम्रान हाश्मी अशा अनेक कलाकारांनी भूमिकेसाठी मराठी भाषेची तोंडओळख करून घेतली आहे. पण जेव्हा वयाच्या ७१व्या वर्षी बिग बी वेळात वेळ काढून मराठी भाषा शिकत आहेत, असं समजलं तेव्हा बऱ्याच जणांमध्ये आपणही मुंबईत राहून मराठी भाषा शिकायला हवी, याबाबत इच्छा निर्माण झाली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 30, 2013, 11:47