Last Updated: Wednesday, July 10, 2013, 18:34
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई बॉलीवूडमध्ये संगीतमय जादू करणारे ओ. पी. नय्यर यांची नात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. निहारिका रायझडा आता बॉलिवूड प्रवेशासाठी सज्ज झालीये. विक्रम प्रधान दिग्दर्शित आगामी बॅंग बॅंग बॅंकॉक या चित्रपटात निहारिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमाचे निर्माते लक्ष्मण चट्टोपाध्याय आहेत. निहारिका आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. "माझे स्वप्न हळूहळू साकार होत असल्याचे मला दिसून येत आहे. मला संगीताची देणगी माझ्या आजोबांकडून मिळाली; मात्र माझ्यात अभिनयाचाही छुपा गुण आहे. तो या चित्रपटामुळे मला प्रेक्षकांसमोर मांडायची संधी मिळाली आहे,`` असं निहारिकाचं म्हणणं आहे.
‘बॅंग बॅंग बॅंकॉक` चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे लवकरच एक नवा चित्रपट त्याचबरोबर एक नवा चेहराही पडद्यावर दिसेल. या चित्रपटात तिच्यासोबतच साहिल आनंद, नमित खन्ना, सिद्धार्थ गुप्ता हे कलाकारही पडद्यावर झळकतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 10, 2013, 18:27