Last Updated: Sunday, June 15, 2014, 12:02
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईबॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता एकही आयटम सॉग करणार नाही असं सांगतेयं. कारण की, तिला आयटम सॉग करताना मजा येत नाही असं तिच म्हणणंय.
2012 ला रिलीज झालेला ‘फरारी की सवारी’ चित्रपटातच विद्याने ’मला जाऊ दे’ आयटम सॉग केलं होते.
विद्याचा आगामी चित्रपट बॉबी जासूसच्या प्रमोशनच्या वेळी त्या चित्रपटाचा ‘बॉबी को सब मालूम है’ ब्लॉगचे लॉन्चिंग करण्यात आलं.
या चित्रपटात विदयाने गुप्तहेराची भूमिका निभावली आहे. येत्या 4 जुलै ला चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटचे प्रोडक्शन बॉर्न फ्री इंटरटेन्मेंट हे दिया मिर्झा आणि साहिल संघाचे आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक समर शेख आणि विदया सोबत अभिनेता अली फझल देखील चित्रपटात दिसणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 15, 2014, 12:02