Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:19
www.24taas.com, झी मीडिया, पुणे आपली पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे करून संजय दत्तनं पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. परंतु या अर्जावर देण्यात येणारा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणातील दोषी ठरलेल्या संजय दत्तनं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली. सध्या तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ‘संजय दत्तला पॅरोलवर सोडण्यात यावे अथवा नाही याविषयी पोलिसांकडून स्पष्ट अहवाल अपेक्षित आहे. ` मोघम तपशीलाच्या आधारे हा निणर्य घेता येणार नाही. पोलिसांनी पाठविलेल्या अहवालात त्रुटी असल्याने तो परत पाठविण्यात आला आहे’ असं विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी म्हटलंय. पोलिसांकडून अहवाल आल्यावर पॅरोलचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कारावासाची शिक्षा भोगताना कैद्यांना पॅरोलची रजा (अभिवचन) मिळते. संजय दत्त येरवडा कारागृहात दाखल झाल्यावर त्याने पहिल्यांदाच पॅरोलवरील रजेसाठी अर्ज दाखल केलाय. मात्र , त्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्याचे कारण आवश्यक असते. ही रजा मिळावी यासाठी संजयने आपली पत्नी मान्यता आजारी असल्याचं कारण दिलंय. हा अर्ज करूनही आता महिना उलटलाय. त्यामुळे हे कारण आता संयुक्तिक आहे का नाही, याची तपासणी पोलिसांना करावी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलंय.
पॅरोल रजेचा संजय दत्तचा अर्ज विभागीय आयुक्त देशमुख यांना मिळाला. त्यावर देशमुख यांनी पोलिस आयुक्तांकडून त्यावरील अहवाल मागविलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 12:19