Last Updated: Tuesday, May 21, 2013, 13:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘तानी’ हा मराठी सिनेमा मल्टिप्लेक्स शोपासून वंचित राहिलाय. अरुण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांची यात प्रमुख भूमिका आहे. ‘औरंगजेब’ सिनेमाच्या प्रदर्शनामुळे तर ‘तानी’ला एका शोसाठीही मारमार करावी लागतेय.
‘तानी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले. तरीही एकही मल्टिप्लेक्स या सिनेमाचे खेळ लावायला तयार नाही. मुंबईत फक्त एकाच सिनेमागृहात या चित्रपटाचा शो पाहायला मिळतोय. यापूर्वी दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या १६ हिंदी आणि मराठी सिनेमांमुळे मल्टिप्लेक्स उपलब्ध नसल्याचं कारण मल्टिप्लेक्स मालकांनी पुढे केलंय.
याबाबत सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे तक्रार केली. चित्रपट सेनेच्या दबावामुळे मल्टिप्लेक्सधारक कालपर्यंत ‘तानी’ सिनेमाला एक शो द्यायला तयार झाले होते. मात्र, पुन्हा मल्टिप्लेक्सधारक आपला आडमुठेपणा दाखवत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 13:30