करण–शाहरुखचं न तुटणारं नातं!, No rift between Shah Rukh Khan and Karan Johar?

करण–शाहरुखचं न तुटणारं नातं!

करण–शाहरुखचं न तुटणारं नातं!

www.24taas.com, मुंबई

करण जोहर आणि शाहरुख खान या दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलंय, या बातमीला करणनं साफ धुडकावून लावलंय.

‘मी शाहरुखला माझ्या कुटुंबातील एक हिस्सा मानतो’ असं सिनेनिर्माता करण जोहर यानं म्हटलंय. करण आणि शाहरुखच्या मैत्री बॉलिवूडमध्ये सर्वज्ञात आहे. गेल्या वर्षी झालेल्या शाहरुखच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीच्या वेळी करण मात्र अनुपस्थित राहिला होता. त्यावेळी सगळ्यांच्या नजरा या दोघांकडे वळल्या होत्या. नंतर समजलं की, शाहरुखच्या पार्टीत न जाता करण सलमान खानसोबत जवळीक वाढवायचा प्रयत्न करत होता.

याच संबंधात शाहरुखशी आता संबंध कसे आहेत, असा प्रश्न करणला विचारला गेला. तेव्हा ‘शाहरुख हा माझ्या कुटुंबातील व्यक्तिंपैकी एक आहे. आणि मला वाटतं या वरूनच बाकी साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील’ असं करणनं म्हटलंय.

First Published: Wednesday, March 13, 2013, 14:31


comments powered by Disqus