‘घनचक्कर’ला संजूबाबाचा अलविदा... , No SFL video, ‘Ghanchakkar’ for Sanjay Dutt

‘घनचक्कर’ला संजूबाबाचा अलविदा...

‘घनचक्कर’ला संजूबाबाचा अलविदा...
www.24taas.com , मुंबई

मुंबई सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर संजय दत्तला लवकरच तुरुंगात जावं लागणार आहे. संजयला पाच वर्षांसाठी तुरुंगात जावं लागणार, हे समजल्यानंतर मात्र संजूबाबा काम करत असलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शकांचे धाबे दणाणले. मात्र, इतर सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी संजयनं ‘घनचक्कर’ला टाटा केलंय.

मुंबई बॉम्बस्फोटात अवैधपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार त्याला पुढची साडे तीन वर्ष तुरूंगात काढावी लागणार आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार त्याला येत्या तीन आठवड्यांत पोलिसांसमोर शरण जायचंय. पण बॉलीवूडचे जवळजवळ २५० कोटी संजयवर लागले आहेत. संजयने त्याचे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे लागलाय आणि त्यासाठीच त्यानं घनचक्करमधल्या एका छोट्या भूमिकेला तिलांजली देण्याचा निर्णय घेतलाय. ‘घनचक्कर’ या सिनेमात इम्रान हाश्मी आणि विद्या बालन एकत्र दिसतील.




संजय दत्त राज कुंद्राच्या ‘सुपर फाईट लीग’साठी एक व्हिडिओ शूट करणार होता. परंतू आपल्या कुटुंबाला वेळ मिळावा, या कारणास्तव त्यानं हे कामही डावललं आहे.

First Published: Wednesday, April 3, 2013, 18:07


comments powered by Disqus