Last Updated: Tuesday, July 9, 2013, 10:34
www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा वडोदराच्या एका स्थानिक न्यायालयानं बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावर ‘अश्लीलता’ पसरवण्याचा ठपका ठेवलाय. तसंच मल्लिकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटदेखील दाखल करण्यात आलंय.
वडोदराच्या जिल्हा न्यायालयानं वारंट बजावतानाच मल्लिकाला १९ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिलाय.
वडोदरा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नरेंद्र तिवारी यांनी ३१ डिसेंबर २००६ रोजी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या अगोदरच्या संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत मल्लिकानं ‘अश्लील नृत्य’ सादर केल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात मल्लिकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावणीचीही मागणी त्यांनी केली होती. ती न्यायालयानं मान्य केल्यानं मल्लिका चांगलीच अडचणीत आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 9, 2013, 10:34