सोनाक्षीचं झालं पुन्हा एकदा नामकरण, nonakshi`s name changed in once upon a time in mumbai again

सोनाक्षीचं झालं पुन्हा एकदा नामकरण...

सोनाक्षीचं झालं पुन्हा एकदा नामकरण...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सोनाक्षी सिन्हा हिचा आगामी ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडू नये यासाठी तिचं नाव बदलण्यात आलंय.

या फिल्मचे दिग्दर्शक मिलन लुथारिया हे आहेत. या चित्रपटात सोनाक्षीचे नाव यास्मीन हे होते. मात्र ‘यास्मीन जोसेफ’ हे नाव अभिनेत्री ‘मंदाकिनी’ यांचे खरे नाव असल्यामुळे मिलन लुथारिया यांनी सोनाक्षीचं नाव यास्मीनवरून ‘जास्मीन’ केलंय. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले ‘आम्हालाही याची कल्पना नव्हती. हे फक्त एका योगायोगाने घडलं असावं. नाव बदलल्यामुळे या चित्रपटातील काही भागांचं डबिंग करावं लागलंय.

मिलन लुथारिया यांचा ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. या अक्षय कुमार, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, आणि सोनाली बेंद्रे हे कलाकार आहेत. एकता कपूर ही या चित्रपटाची निर्माता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 24, 2013, 12:46


comments powered by Disqus