अफेअर्सच्या गप्पा मला आवडत नाहीत - अर्जून कपूर not interested in affair gossips - arjun kapoor

अफेअर्सच्या गप्पा मला आवडत नाहीत - अर्जून कपूर

अफेअर्सच्या गप्पा मला आवडत नाहीत - अर्जून कपूर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माझी सध्या सर्वांबरोबर चांगली मैत्री आहे, तसेत अफेअर्सच्या गप्पांमध्ये मला रस नाही, असं अर्जून कपूरने म्हटलंय.

मात्र अर्जून कपूरवर हे सांगण्याची वेळ का आलीय हे ही तेवढंच महत्वाचं आहे.

`टू-स्टेटस` , `इश्कजॉँदे` या चित्रपटांतून नावारूपाला आलेला बॉलीवूड अभिनेता अर्जून कपूरचे नाव अनेकदा त्याच्या सहकलाकारांबरोबर जोडण्यात आले.

याविषयी बोलताना अर्जूनने मात्र, आपल्याला अशाप्रकाच्या कोणत्याही चर्चा अथवा बातम्यांमध्ये रस नसल्याचे सांगितले.

प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या अफेअर्सविषयी होणारी चर्चा म्हणजे खासगी आयुष्यात `सिंगल` राहण्यासाठीची किंमत असल्याचे अर्जून सांगतो.

आलिया भट आणि परिणीती चोप्रा यांच्याबरोबर अर्जून कपूरची असणारी `ऑफ-स्क्रीन` केमेस्ट्री कायमच प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय ठरत आली आहे.

मात्र, आलिया किंवा परिणीती यांच्याबरोबर आपली चांगली मैत्री असल्या कारणाने चित्रपटात काम करताना दोघींशी आपले छान ट्युनिंग जुळते.

तसेच इंडस्ट्रीत काम करताना तुम्ही सिंगल असाल तर, तुमच्याविषयी अशाप्रकारच्या चर्चा रंगणे साहजिक असल्याचे अर्जून कपूरने स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 09:50


comments powered by Disqus