Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:39
www.24tas.com, झी मीडिया, नवी दिल्ली पती हृतिक रोशनपासून वेगळं होण्याच्या निर्णयावर येऊन पोहचलेल्या सुझान खान हिनं पहिल्यांदाच जाहीरपणे मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘आयुष्यात कधी कधी कठोर निर्णय घ्यावेच लागतात’ अशी प्रतिक्रिया सुझाननं यावेळी दिलीय. अर्जुन रामपालबाबत बोलताना सुझाननं ‘अर्जुन माझा चांगला मित्र आहे’ असं तीनं म्हटलंय.
गेल्या १७ वर्षांपासूनच नातं तोडत सुझान आणि हृतिकनं नुकतंच एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. हृतिककडून यासंबंधी मीडियासमोर ही गोष्ट जाहीर केली गेली.
हृतिक आणि सुझान गेल्या १७ वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. १३ वर्षांपूर्वी ही दोघं विवाहबंधनात अडकले होते. हृतिकच्या म्हणण्यानुसार, सुझाननं आपले नातेसंबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय... आणि त्यामुळे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.
हृतिक-सुझानचं ब्रेकअप होण्यामागचं कारण, अर्जुन रामपाल असल्याची चर्चा सुरू होती. यावर, अर्जुननं हृतिक-सुझान आपले चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या विभक्त होण्यामागे आपली काहीही भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘माझी पत्नी मेहर आणि मी हृतिक आणि सुझानचे खूप चांगले मित्र आहोत’. अर्जुनचीच री ओढत सुझाननंही अर्जुनसोबत आपली केवळ चांगली मैत्री आहे असं म्हटंलय.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 09:24