Last Updated: Thursday, April 18, 2013, 15:53
www.24taas.com, मुंबईशाहरुख खान असं आपल्या कुत्र्याचं नाव ठेवल्यामुळे आमिर खानवर शाहरुख खानचे फॅन्स नाराज झाले होते. अखेर आमिर खानला याबद्दल त्यांची माफी मागावी लागली होती. आता एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिकेने त्यावर कडी करत आपल्या सिनेमात बोकडचं नाव शाहरुख खान ठेवलं आहे.
जानकी विश्वनाथन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिकेच्या आगामी सिनेमात शाहरुख नावाचा बोकड पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं नावच ‘बकरापूर’ असं आहे. मुख्य म्हणजे हे बोकड या सिनेमातील मुख्य पात्र असेल. हा सिनेमा विनोदी असून यात एक लहान मुलगा आणि बोकड यांची मैत्री दाखवली आहे.
सिनेमातील बोकडाला शाहरुखचं नाव देण्यापूर्वी दिग्दर्शिकेने अनेक गावांत पाहाणी केली. तेव्हा तिला आढळून आलं, की गावकरी आपल्या जनावरांची नाव सुपरस्टार्सच्या नावावरून ठेवतात. शाहरुख नावाची सुमारे ४०० बोकडं या पाहाणीत दिग्दर्शिकेला आढलून आली. सलमान नावाचेही अनेक बोकड होते. पण शाहरुख नावाचं बोकड जास्त सुंदर होतं, असं जानकी विश्वनाथन याचं म्हणणं होतं.
First Published: Thursday, April 18, 2013, 15:53