रजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत, Now kochadaiyaan Marathi cinema of Rajnikanth

रजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत

रजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांतचा `कोचाडियान` मराठीसह सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमीळ, तेलुगू, हिंदी, पंजाबी आणि भोजपुरी भाषेत पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मागील काही मराठी चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर हिंदी चित्रपटांना चांगलीच टक्कर दिली होती.

याआधी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डबिंग करून दुसऱ्या भाषेत प्रदर्शित केले जात असत, मात्र `कोचाडियान` चित्रपट एकाच वेळी सहा भाषांमध्ये डब करून देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्‍विनने केले आहे. चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट थ्रीडी रूपातही प्रदर्शित होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 11:31


comments powered by Disqus