कोयल `मिस वर्ल्ड`सोबतच बॉलिवूडसाठीही तयार!, now miss world and bollywood on koyal ranas wish list

कोयल `मिस वर्ल्ड`सोबतच बॉलिवूडसाठीही तयार!

कोयल `मिस वर्ल्ड`सोबतच बॉलिवूडसाठीही तयार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

५१ वा फेमिना मिस इंडिया २०१४ चा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या जयपूरच्या कोयल राणाचं पुढचं लक्ष्य आहे `मिस वर्ल्ड`... परंतु, याच दरम्यान तिला बॉलिवूडमधून काही चांगले प्रस्ताव आले तर तिला काही हरकत नसेल, असं कोयलनंच स्पष्ट केलंय.

शनिवारी झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मुकूट प्राप्त करणारी कोयल म्हणते, मला जगाच्या डोक्यावर विराजमान होण्याचा अनुभव घेतेय. मला माझ्या पुढच्या आयुष्यात काय करायचंय याबद्दल माझ्या कल्पना अगदी स्पष्ट आहेत. मिस इंडिया बनल्यानंतर माझं पुढचं लक्ष्य असेल `मिस वर्ल्ड`

कोयल माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हिला आपली प्रेरणा मानते. तिच्या म्हणण्यानुसार, सुष्मितानं आपल्या आयुष्यात खूप काही मिळवलंय.

सिनेमांबद्दल काय मत आहे? या प्रश्नावर कोयल म्हणते, `मी सध्या मिस वर्ल्डवर लक्ष केंद्रीत केलंय. परंतु, याच दरम्यान बॉलिवूडमधून जर चांगले प्रस्ताव मिळाले तर मी त्यासाठीही तयार आहे. परंतु, आत्ताच काहीही भाष्य करणं थोडं घाईचंच ठरेल`.

जयपूरमध्ये जन्मलेल्या आणि दिल्लीत लहानाची-मोठी झालेली कोयल म्हणते, तिच्यासाठी शिक्षण हेही मिस इंडिया बनण्याइतकंच महत्त्वाचं आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 10:23


comments powered by Disqus