Last Updated: Sunday, June 15, 2014, 16:14
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईसर्वात जास्त चर्चेत असलेला टीव्ही रियालॅटी शो बिग बॉसवर आधारित लवकरच चित्रपट येणारं आहे, सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे.
एंडेमॉल इंडियाचे सीईओ आणि एमडी दिपक धर यांनी सांगितलं की, आम्ही लवकरच बिग बॉस वर चित्रपट बनवत आहोत.
चित्रपटाच्या स्क्रिप्टचे संपूर्ण काम झाले असून, त्यासाठी मोठ्या दिग्दर्शकांची भेट घेण्यात येईल. चित्रपटाच्या स्टार कास्टचीही बोलणं झालं.
हा चित्रपट बिग बॉस च्या घरावर आधारित असेल, तसेच चित्रपटासंबंधी आणखी काही गोष्टी सांगण्यात येतील असे दीपक यांनी सांगितलं.
सूत्रांच्या सांगण्यानुसार ह्या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता सलमानला अप्रोच केलं, चित्रपटाची स्क्रिप्ट रुमी जाफरीनं पूर्ण केली आहे, याच्या आधी रुमीने सलमान खान सोबत गॉड तुसी ग्रेट हो चित्रपटात काम केलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 15, 2014, 16:14