सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!`O Teri` film is on Suresh Kalmadi`s life

सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!

सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

येत्या २८ मार्चला रिलीज होणारा विनोदी चित्रपट `ओ तेरी` हा सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. कलमाडी यांच्यावर २०१०मधील कॉमनवेल्थ खेळांमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे.

`ओ तेरी` हा विनोदी चित्रपट असून दोन पत्रकारांभोवती तो फिरतो. प्रांतभ प्रताप आणि आनंद इश्वर्मन देवदत्त सुब्रमण्यम या भूमिकांभोवती हा चित्रपट फिरतो जे रोज बातम्या मिळविण्यासाठी कसा संघर्ष करतात हे चित्रपटात दाखवलंय. मग नंतर त्यांच्या करिअरमध्ये एक टर्न येतो.

चित्रपटात अनुपम खेर यांनी साकारलेली भूमिका म्हणजे सुरेश कलमाडी यांच्यावर आधारित आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश बिष्ट यांनी सांगितलं की चित्रपटाची कथा वास्तविक जीवनावर आधारित आहे. पण सध्या त्याबाबत काही सांगू शकत नाही.

अभिनेते पुलकित सम्राट आणि बिलाल अमरोही यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 15:10


comments powered by Disqus