Last Updated: Saturday, January 25, 2014, 20:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सलमान खानचा पुलकित सम्राट तसंच नवख्या बिलाल अमरोही अभिनित `ओ तेरी` या सिनेमाचा ट्रेलर नकताच लॉन्च करण्यात आलाय. खुद्द सलमान भाईचा आवाज आपल्याला ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो.
सध्याच्या राजकीय घडामोडी, घोटाळे आणि भ्रष्टाचारानं बरबटलेल्या देशाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली ही एक `काल्पनिक` कथा... या सिनेमाचे दोन हिरो म्हणजेच पुलकित आणि बिलाल या चित्रपटात पत्रकारांच्या भूमिकेत दिसतात. पण, झोळ्या अडकवून फिरणारे हे रिपोर्टर्स नाहीत तर सध्या `कूल` आणि `ड्यूड` समजले जाणारे हे रिपोर्टर्स...
या सिनेमात सना दियाझ, अनुपम खेर, विजय राझ, वरून पाहवा हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. अतुल आणि अल्विरा अग्निहोत्री यांची निर्मिती असलेला सिनेमा २८ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
चला, तर पाहुयात... या दोन ड्युड रिपोर्टर्सची मनोरंजनात्मक कामगिरी... •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 25, 2014, 19:55