Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता ओम पुरी यांना हॉलिवूडमधून मिळालेली ‘द हंड्रेड फूट जर्नी’ आता जरा जास्तच लांबणार असं दिसतंय. कारण, या चित्रपटाच्या शुटींगसाठी जाण्यात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ओम पुरी यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.
अलिकडेच, ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनी पतीवर काठीनं मारहाणीचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांनी ओम पुरी यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचं कलम लावलंय. त्यानंतर पहिल्यांदा फरार म्हणून घोषित करण्यात आलेल्या ओम पुरी यांना अटकही करण्यात आली. पण, आता त्यांना दररोज पोलिसांमध्ये हजेरी लावावी लागत आहे. त्यानंतर ताबडतोब जामीन मिळाल्यानं त्यांची सुटकाही झाली. यामुळे त्यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
‘द हंड्रेड फूट जर्नी’ ची शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार होती. यासाठी ओम युरोपला जाणार होते. ते आणखी काही दिवस गेले नाही तर ही भूमिका दुसर्या् भारतीय अभिनेत्याकडे जाऊ शकते. ‘द हंड्रेड’ ची निर्मिती स्टीव्हन स्पीलबर्ग आणि ओपरा विनफ्रे करत आहेत तर लास हॅलस्ट्रॉम हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, September 3, 2013, 10:31