Last Updated: Wednesday, May 28, 2014, 23:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई लाईमलाईटमधून बराच काळापासून गायब असलेला बॉलिवूड अभिनेता आणि धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय... ही चर्चा त्याच्या फिल्मविषयी नाही तर त्याच्या कारनाम्यांमुळे सुरु झालेली ही चर्चा आहे...
सूत्रांच्या माहितीनुसार, बॉबीला एका गार्डनं थोबाडल्याची बरीच चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. मुंबईच्या एका बारमध्ये हा प्रकार घडल्याचं समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉबी देओल करण जोहरच्या बर्थडे पार्टीसाठी उपस्थिती झाला होता. यावेळी, पिऊन टल्ली झालेल्या बॉबीनं एका सिक्युरिटी गार्डला दारु आणण्याचं फर्मान सोडलं...
यामुळे संतापलेल्या गार्डनं बॉबीला एक जोरदार थप्पड ठेऊन दिली. नशेत असलेल्या बॉबीला त्यावेळेस पार्टीतून निघून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 23:05