सेक्स टेपः अभिनेत्री मीरासह पतीविरोधात अटक वॉरंट, pakistan court issues warrant against actress meer

सेक्स टेपः अभिनेत्री मीरासह पतीविरोधात अटक वॉरंट

सेक्स टेपः अभिनेत्री मीरासह पतीविरोधात अटक वॉरंट

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने कथित सेक्स टेप प्रकरणात अभिनेत्री मीरा आणि तिच्या पतीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना दोन एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधिश सफदर भट्टीने एका याचिकेवर हे आदेश दिले आहे. मीरा आणि तिचा पती कॅप्टन नावेद शहजादवर गुन्हा करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

न्यायाधीशांनी या प्रकरणात रिपोर्ट नाही सादर केल्याबद्दल पोलिसांना फटकारले आहे.


याचिकाकर्त्याने आरोप लावला की या दाम्पत्याने समाजात अश्लिलता पसरवली आणि इस्लामच्या मूल्यांना आव्हान दिले आहे. शहजादने म्हटले की या व्हिडिओला विवादास्पद बनविण्याचे कोणते कारण नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही पती-पत्नीच आहे.

हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी इंटरनेटमध्ये रिलीज करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे पाकिस्तानात वाद निर्माण झाला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 25, 2014, 21:13


comments powered by Disqus