सहा वर्षांची असल्यापासून अनेकदा झाला रेपः पामेला अँडरसन, Pamela Anderson Says She Was Raped as a Chi

लहानपणापासून अनेकदा झाला रेपः पामेला अँडरसन

लहानपणापासून अनेकदा झाला रेपः पामेला अँडरसन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अँडरसनने आपल्या ब्लॉगमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहे. पामेलाने सांगितले की, सहा वर्षांची असतानापासूनच माजा लैंगिक छळ आणि बलात्कार झाला आहे.

बिग बॉस या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर भारतात चर्चेत आलेल्या पामेलाने सांगितले की, केवळ सहा वर्षांची असताना पहिल्यांदा लैंगिक छळ झाला होता. विशेष म्हणजे पामेलाला सांभाळणाऱ्या महिलेनेच तिला शिकार बनवले होते. १२ वर्षांची झाली तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्याच्या काही आठवड्यानंतर गँगरेप करण्यात आला. दारूच्या आहारी गेलेल्या वडिलासह तिचे आयुष्य खूप कठीण गेले.

आईच्या खूप प्रयत्नांनंतरही ती जगात असुरक्षित राहिली. अनेकवेळा आत्महत्येचा विचार मनाला चाटून गेला, पण चांगल्या भविष्यासाठी मी जगली, असे पामेलाने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

माझे लहानपण सोपे नव्हते. १२ वर्षांची असताना आपल्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा बॉयफ्रेंडच्या भावाने एक खेळ शिकविण्याच्या बहाण्याने मला शिकार बनवले. पहिल्यांदा त्याने मला बोर्ड गेम शिकविण्याची गोष्ट केली आणि नंतर माझ्या कमरेत हात घातला. त्यानंतर २५ वर्षीय त्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. मी इतकी घाबरली होती की, हा प्रकार कोणाला सांगण्याची माझी हिम्मत झाली नाही.

माझ्या बॉयफ्रेंडने आपल्या सहा मित्रांसह माझ्यावर गँगरेप केला, नववीमध्ये शिकत असताना त्याने हे कृत्य केले. त्याने विचार केला की माझा गँगरेप केला तर मज्जा येईल. त्याने आपल्या सहा मित्रांसह माझा गँगरेप केला. मला मरायचे होते. माझ्यासाठी लोकांवर विश्वास ठेवणे खूप कठीण झाले.

माझ्या पालकांनी मला नेहमी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पण जग माझ्यासाठी नेहमी असुरक्षित राहिले. माझे वडील व्यसनाधिन होते आणि आई वेट्रेस म्हणून दोन नोकऱ्या करीत होती. माझी नेहमी रडायची. तिला सोडून वडिल अनेक दिवस बाहेर राहत असे. आईला होणारा त्रास पाहून तिला आणखी त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी लैगिक शोषण आणि रेपचे आईला सांगितले नसल्याचे पामेलाने आपल्या ब्लॉगमध्ये लिहले आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 19, 2014, 18:11


comments powered by Disqus