परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!Parineeti Chopra not wearing bikini in `Hasi to Fasi`

परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!

परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!
www.24taas.com, पीटीआय, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री बिकिनीत असणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. मात्र सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा आगामी `किल दिल` या चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

पण, या चर्चेत तथ्य नाही असं परिणीती चोप्रानं म्हटलंय. त्याचबरोबर ती हे सुद्धा म्हणते की, कथानकाची गरज असल्यास बिकिनी घालण्याला माझी `ना` नाही. `किल दिल`मध्ये मी बिकिनीमध्ये मुळीच दिसणार नाही. ती अफवाच आहे. या चित्रपटात बिकिनीमधील दृश्याची अजिबात आवश्यकता नाही, असं परिणीतीनं स्पष्ट केलंय.

पडद्यावर बिकिनी घालावी लागल्यास माझा त्याला विरोध नाही. मात्र, त्यासाठी मला आणखी चांगला `शेप` हवा,` असं `शुद्ध देसी रोमान्स` फेम परिणितीनं सांगितलं. परिणिती म्हणाली, `या चित्रपटाचं कथानक दिल्लीचं आहे, आणि दिल्लीकर रस्त्यांवर बिकिनी घालून फिरण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. विशेष म्हणजे सध्या मी बिकिनीला साजेशीही नाहीय. जेव्हा मी तशी होईल तेव्हा बिकिनी घालेन. मला आणखी चांगले कपडे घालायचे आहेत. माझ्या जाडीमुळं सहा महिन्यांपूर्वी मला तेही शक्य होत नव्हतं.

करण जोहर आणि अनुराग कश्यप निर्मित `हसी तो फसी` हा लवकरच प्रदर्शित होत असून, त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत परिणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 16:02


comments powered by Disqus