परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!, Parineeti Chopra wants to romance Shaan

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

परिणीती ही आपल्या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी या शो मध्ये आली होती. ‘ए क्या बोलती तू’ या गाण्यावर शाननं सादर केलेल्या डान्सचा आनंद परिणीतीने घेतला. “गायक तर तू आहेसच, पण आता खुप चांगला डान्स आणि चांगली अॅक्टिंगही केलीस. शुद्ध देसी रोमान्सच्या सिक्वलमध्ये मी तुझ्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा असल्याचं,” परिणीतीनं शानच्या डांसवर कमेंट देतांना म्हटलं.

टपोरीच्या वेशभूषेत असणाऱ्या शानला या गोष्टीचा आनंद झाला. “मात्र हिरोचा नाही तर मला काकाचा रोल करावा लागेल”, असं शान म्हणाला. त्यावेळी तिन्ही जज म्हणजे अभिनेत्री माधुरी दिक्षीत, रेमो डिसूजा आणि करण जोहर हे देखील उपस्थित होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 11:30


comments powered by Disqus