ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू , Philip Seymour Hoffman dies of suspected drug overdose

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

www.24tass.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

ऑस्कर विजेता अभिनेता फिलिप सीमोर हॉफमॅन यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. मॅनहॅटन येथील वेस्ट व्हिलेज येथे हॉफमॅन यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला.

हॉफमॅन यांच्या डाव्या पायावर इंजेक्शनची सुई होती त्यामुळे मादक पदार्थांच्या ओव्हर डोसमुळे हॉफमॅनचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. पोलिसांनी हॉफमॅनच्या घरात हेरॉईन सापडले असल्याचे स्पष्ट केले.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका फोनमुळे पोलिसांना खबर मिळाली होती. त्यानतंर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हॉफमॅनसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन हॉफमॅन कुटुंबीयांनी केले. फिलिप हॉफमॅन हे ४६ वर्षांचे होते. उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचे तीन वेळा ऑस्कर नामांकन आणि २००५ चे ऑस्कर `बेस्ट अॅक्टर अॅवार्ड` त्यांनी पटकावलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 20:25


comments powered by Disqus