Last Updated: Tuesday, December 4, 2012, 20:55
www.24taas.com, मुंबईप्रियंका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीमुळे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये हाहःकार निर्माण झाला होता. शाहरुख आणि प्रियंकाच्या जवळीकीमुळे शाहरुखच्या वैवाहीक आयुष्यातही वादळ निर्माण झालं होतं. मात्र शाहरुखने दूर केल्यावर प्रियंकाने सलमान खानशी मैत्री वाढवली आहे.
नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या एखा इव्हेंटमध्ये प्रियंकाचं सलमानशी जवळीक वाढवणं स्पष्ट दिसत होतं. ते दोघं दुबईमध्ये सर्वत्र एकत्रच फिरताना दिसत होते. प्रियंकानेही सलमान खानसोबत काम करायला सर्वांत जास्त आवडतं, असं प्रियंकाने कबूल केलंय.
काही दिवसांपूर्वी प्रियंका हेच शाहरुखबद्दल बोलत होती. मात्र आता बोलताना तिने शाहरुख खानचा उल्लेखही केला नाही. मात्र सलमान खानसुद्धा प्रियंका चोप्रा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असं म्हणत आहे. त्यामुळे यांच्यातील मैत्री खरी आहे आणि शाहरुखला एकटं पाडण्याचं कारस्थान तर नाही ना, असा प्रश्न काहींनापडला आहे.
First Published: Tuesday, December 4, 2012, 20:55