Last Updated: Thursday, May 8, 2014, 08:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपूनम पांडे यांनी आपलं आडनाव पूनम पांडे असल्यानेच पोलिसांनी आपली नाहक चौकशी केल्याचं म्हटलं आहे. पूनम पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी रात्री मी संपूर्ण कपडे घातले होते, तसेच कारमध्ये मी आपल्या भावासोबत होती आणि मी कोणतंही आक्षेपार्ह करत नव्हते. ही घटना शनिवारी मीरारोडच्या पूनम पांडे यांच्या घरी घडली.
पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता माझी चौकशी केली. जोपर्यंत त्यांना माहित नव्हतं माझं आडनाव पांडे आहे, पोलिसांचं माझ्याशी वागणं साधं होतं, मात्र पूनम पांडे आहे हे कळल्यावर पोलिसांच्या वागण्यात बदल झाला.
पोलिस माझ्याशी तालिबान्यांसारखे वागले, माझा छळ केला, असा आरोपही पूनम पांडेने केला आहे.
पूनम पांडे म्हणते माझं आडनाव पांडे असलं तरी मी मुंबईत लहानपणापासून वाढले आहे, माझ्या चौकशीचा अधिकार पोलिसांनी कुणी दिला आहे, असा सवालही पूनमने केला आहे.
या प्रकारामुळे माझ्या घरातील सर्व जण तणावात आहेत. पोलिसांच्या कारवाईवरून माझ्या आई-वडिलांना वाटतंय यात माझीचं चूक आहे. मी त्यांना कसं समजावू असंही पूनम पांडेने म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 7, 2014, 14:27