`नशा` हिट झाला, तर चाहत्यांसाठी होईन नग्न- पूनम पांडे Poonam Pandey promises to get naked for fans

`नशा` हिट झाला, तर चाहत्यांसाठी होईन नग्न- पूनम पांडे

`नशा` हिट झाला, तर चाहत्यांसाठी होईन नग्न- पूनम पांडे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वारंवार अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह वक्तव्य यांमुळे गाजणारी पूनम पांडे शुक्रवारी २६ जुलै रोजी नशा या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यावेळीही तिने पुन्हा वादाला तोंड फोडलं आहे. ‘नशा’ सिनेमा हिट झाला, तर चाहत्यांसाठी सगळे कपडे मी उतरवीन असं पूनमने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

अमित सक्सेना दिग्दर्शित `नशा` सिनेमात पूनम पांडेसोबत शिवम हा नवा कलाकार अहे. १८ वर्षांचा मुलगा आणि २५ वर्षीय तरुणी यांच्यातील शारीरिक संबंधांवर हा सिनेमा धारलेला आहे. सुरेंदर सुनेजा आणि आदित्य भाटिया यांच्या ईगल होम एंटरटेनमेंट बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूनम पांडे जोरदार प्रयत्न करत आहे. या सिनेमाची पोस्टर्सही प्रक्षोभक आहेत. या पोस्टर्सना शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. मात्र आता सिनेमा हिट झाला, तर पूनम पांडे चाहत्यासाठी नग्न होण्याचं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी भारताने विश्वचषक जिंकल्यावर तसंच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यावर पूनमने निर्वस्त्र होण्याचं वक्तव्य केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 19:09


comments powered by Disqus