Last Updated: Tuesday, January 28, 2014, 08:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहॉट अभिनेत्री पूनम पांडेची वेबसाईट हॅक केली गेली आहे. पाकिस्तानमधील एका हॅकरने तिची साईट हॅक केलेय. त्यामुळे पूनम प्रचंड घाबरली आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली आहे.
पूनम पांडे हिचे अनेक हॉट फोटो तसेच व्हिडीओ पाहण्यासाठी नेहमीच वेबसाईटवर चाहते लॉगऑन करतात. मात्र, वेबसाईट हॅक झाल्याने तिच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड झालाय. साईट हॅक झाल्यामुळे पूमन पांडे प्रचंड घाबरली असून ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.
हेल्प, हेल्प, माझी वेबसाईट हॅक झाली आहे. मी काय करू? मला खूप भीती वाटत आहे, कोणीतरी मला मदत करा, असे ट्विट पूनमने केले आहे.
पाकिस्तानमधील एका हॅकरने पूनमची वेबसाईट हॅक केल्याचे वृत्त आहे. वेबसाईट हॅक केल्यानंतर पाकिस्तान झिंदाबाद, असा संदेश दिसत आहे. काश्मीरला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवा, असा मेसेजही हॅकरने साईटवर पोस्ट केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 08:53