प्रिती झिंटा कोणाशी करीत आहे डेटिंग?, preity zinta found new love

प्रिती झिंटा कोणाशी करीत आहे डेटिंग?

प्रिती झिंटा कोणाशी करीत आहे डेटिंग?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकदम बिनधास्त आणि कूल गर्ल प्रिती झिंटा सध्या कोणाला तरी डेट करीत आहे. परंतु अजून तिने याचा खुलासा केलेला नाही. प्रितीने केवळ अभिनयात ना कमावले नाही पण बिझनेसही चांगला करून दाखविल आहे.

तसंच तिने प्रेमाच्या बाबतीत एकाच व्यक्तीला निवडल नाही. यापूर्वी ती वाडिया ग्रुपचे प्रमुख नेस वाडिया यांना डेट करीत होती. त्यांचे अफेअर बरेच काळ चालले, त्या दोघांनी आयपीएलची एक टीमही खरेदी केली. पण काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पण त्यांनी आपले प्रोफेशन नाते तोडले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर प्रितीने त्याचे भांडवल केले नाही.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रितीने आपण एका व्यक्तीशी टेडिंग करीत असल्याचे मान्य केले आहे. पण त्या व्यक्तीच नाव सांगितले नाही. तिला वाटत नाही की तिचे खासगी आयुष्य मीडियामध्ये यावे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 18:22


comments powered by Disqus