Last Updated: Tuesday, June 17, 2014, 20:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पार्टनर, मित्र नेस वाडिया यांच्यात आता कोर्टाबाहेर तडजोड होण्याची शक्यता आहे. `द टेलिग्राफ` नं यासंबंधी वृत्त दिलंय.
अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं तिचा आयपीएलच्या पंजाब संघाचा पार्टनर आणि कधी काळचा मित्र उद्योगपती नेस वाडियाविरोधात छेडछाड केल्याचा आरोप केलाय. तिनं यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. मात्र आता प्रीती-वाडिया प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
प्रीती झिंटानं नेस वाडियांवर केलेले आरोप गंभीर आहे. त्यामुळं या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. याच कारणामुळं दोघांमध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. ही तडजोड माफीच्या स्वरुपात किंवा किंग्ज इलेव्हनमधल्या आर्थिक व्यवहारांच्या स्वरुपातही असण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
या प्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झालीय. त्यात आयपीएल कमिश्नर सुंदररमन यांचाही समावेश आहे. मात्र प्रीती-वाडियांमध्ये तडतोड झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 17, 2014, 20:30