प्रिती झिंटाचा जवाब आज नोंदवला जाण्याची शक्यता Preity Zinta returns to India

प्रिती झिंटाचा जवाब आज नोंदवला जाण्याची शक्यता

प्रिती झिंटाचा जवाब आज नोंदवला जाण्याची शक्यता

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रिती झिंटा परदेश दौ-यावरून मुंबईत परतलीय. मात्र तिचा जबाब आता आजच नोंदवला जाईल, अशी शक्यता आहे.

तिचा या पूर्वीचा बॉयफ्रेंड नेस वाडियांविरोधात छेडछाड केल्याची तक्रार दाखल केलीय.

आता त्या दृष्टीनं तपासाला वेग येणार आहे. जबाब नोंदवण्यासाठी पोलीसच प्रिती झिंटाच्या घरी जातील असं सांगितलं जातंय.

प्रितीचा जबाब घेताना तिच्या वकीलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. पोलीसांकडून 30 मे च्या वानखेडेवरील त्या घटनेला रिक्रिएट केले जाण्याचीही शक्यता आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा रविवारी मुंबईत परतलीय. मुंबईत परतल्यानंतर प्रिती झिंटानं फेसबुकवरुन संवाद साधलाय. नेस वाडियाशी झालेल्या प्रकरणानंतर प्रिती आपलं मौन सोडणार का याची उत्सुकता होती.

फेसबुकवर प्रितीनं मीडियाची माफी मागितलीय. मीडियाशी बोलू शकत नसल्यानं प्रितीनं मीडियाची माफी मागितलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 14:55


comments powered by Disqus