प्रिती झिंटा मुंबईत दाखल, जवाब नोंदवणार ?,priety zinta likely to return to india mumbai police may r

प्रिती झिंटा मुंबईत दाखल, जवाब नोंदवणार ?

प्रिती झिंटा मुंबईत दाखल, जवाब नोंदवणार ?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रीती झिंटाने नेस वाडीया विरुद्ध तक्रार केल्यानंतर ती अमेरिकेला लॉस एंजिलिस गेलीयं. 12 जूननंतर तिला तिच्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त कोणी पाहिलं नाही. या तक्रारीसंबंधी पोलिसांची चौकशी प्रितीच्या जबाबाशिवाय अपूर्ण आहे.

प्रिती रविवारी अमेरिकेहन परत येण्याची शक्यता आहे त्यानंतरच पोलिस तिचा जबाब घेतील. या तक्रारीवर पोलिसांशी काही बोलणे झालं नाहीय. मात्र काही साक्षीदारांचे जवाब नोंदवून घेतले आहेत.

मुंबई पोलिसांनी प्रितीला या प्रकरणावर जबाब नोंदविण्यासाठी एका आठवड्याची वेळ दिली आहे. आशा आहे की, आज ती आपला जबाब नोंदवेल. नेस वाडिया विरोधात खळबळजनक अशी तक्रार केल्यानंतर प्रिती अमेरिकेला गेली होती.

तरीही पोलिसांनी तक्रारीवर तपास सुरु केलाय. मात्र काही मिळालेल्या जवाबानुसार पोलिसांच्या हाती काही लागले नाहीय.

मुंबई पोलिसांनी शनिवारी बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी त्यांचा जवाब घेतलाय. आयपीएलचे सीईओ सुदंररमनची साक्षी आधीच नोंदविली गेलीय. आयपीएल कमिश्नरनी एका आठवड्याच्या वेळ मागितली आहे.

प्रितीच्या वादांत अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीचीही एन्ट्री झालीय. शक्यता आहे, पोलिस या विषयांवर प्रितीची चौकशी करतील.

प्रिती झिंटाचा आरोप होता की 30 मे रोजी नेस वाडियाने वानखेडे स्टेडियमवर तिला अपमानित केले होतं. आता प्रितीच्या जवाबामुळे केसला वेगळे वळण लागू शकेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 11:45


comments powered by Disqus