खुन्नस... तुझी नी माझी खुन्नस!, Priyanka Chopra mends relationship with Saif Ali Khan?

खुन्नस... तुझी नी माझी खुन्नस!

खुन्नस... तुझी नी माझी खुन्नस!

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘बी-टाऊन’मधली मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही चर्चेचाच विषय... यावेळी, प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर या दोन बॉलिवूड हॉटीजमधल्या बिघडलेल्या संबंधांची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात चर्चिली जातेय.

ही चर्चा सध्या सुरू असण्याचा कारण म्हणजे, ‘पिगी चॉप्स’ ही बेगम करिना कपूरचा नवाब नवरा सैफ अली खान याच्यासोबत सिनेमा करण्याचं सारखं सारखं टाळताना दिसतेय... आणि हीच चर्चा सध्या जोरात रंगतेय.

माजी मिस वर्ल्ड असलेल्या प्रियांकानं सैफबरोबर याआधी दोन सिनेमे टाळलेत. ‘कॉकटेल’ आणि ‘हॅपी एन्डींग’ या दोन सिनेमांसाठी तिनं आपल्या उपलब्ध नसलेल्या तारखांचं कारण दिलं... काय तर याच तारखेला तीनं आधीच बर्फी आणि गुंडेसाठी तारखा दिल्या होत्या. पण, हे कारण काही लोकांच्या पचनी पडत नाहीए... करिनाशी असलेली खुन्नस कायम ठेवत तिनं सैफबरोबर काम करण्यास नकार दिला, असं काहींचं म्हणणं आहे.

प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर ‘ऐतराज’ सिनेमात एकत्र दिसल्या होत्या. अनेकदा दोघींनी एकमेकींची सार्वजनिक ठिकाणी बोलताना खिल्ली उडवताना मागे पुढे पाहिलं नव्हतं. एका कार्यक्रमात तर करीनानं प्रियांकाच्या बोलण्याच्या स्टाईल अनैसर्गिक असल्याचं सांगत तिची खिल्ली उडविली होती... आणि त्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झाला होता.

पण, कदाचित प्रियांकाचं मन मात्र यावेळी बदललंय. प्रभुदेवाच्या एका नव्या सिनेमात ती सैफबरोबर दिसू शकेल असं सांगण्यात येतंय... चला, एका बाजुने तर ही खुन्नस मिटवण्याचा प्रयत्न होतोय... पण करीनाचं काय? आपलं शत्रुत्व कधीही न विसरण्यासाठी प्रसिद्ध असलेली करीना पुन्हा एकदा प्रियांकाबरोबर दिसेल?





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 16:39


comments powered by Disqus