Last Updated: Wednesday, September 25, 2013, 07:32
www.24taas.com, पीटीआय, मुंबईआघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी हा किताब पटकावला आहे. हॉट सेक्सी सनी लिऑनने गेल्या वर्षी हा किताब पटकावला होता. तिला आता आपल्या देसी गर्ल प्रियंकाने मागे टाकले आहे.
सर्वात धोकादायक सेलिब्रिटींच्या यादीत प्रियंका पाठोपाठ शाहरूख आणि सलमानचा क्रमांक लागला आहे. अक्षयकुमार आणि करिना कपूर हे टॉप फाइव्हमध्ये आहेत.
इंटरनेटवरून सेलिब्रिटींच्या नावाने खोटया आणि फसव्या जाहिराती देऊन युजरचा पर्सनल डेटा करप्ट करण्यात येतो. यासाठी ज्या सेलिब्रिटींच्या नावांचा जास्त उपयोग केला जातो, या नावांमध्ये प्रियंका चोप्राचं नाव आघाडीवर आहे.
‘मेकॅफे’ या सिक्युरीटी सॉफ्टवेअर उत्पादक कंपनीने केलेल्या पाहणीनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतातील सेलिब्रिटी लोकप्रियतेत रमलेले असतांना, सायबर गुन्हेगार त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत असतात. सायबर गुन्हेगार भारतातील सेलिब्रिटींच्या नावांचे अमिष दाखवून त्यांचा कार्यभाग साधत असतात.
व्यंकट सुब्रमण्यम कृष्णपुर ‘मेकॅफे’ इंडिया सेन्टर व्हिपी इंजिनियरींग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य भारतीय दर्शकांना या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो, हीच बाब सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडते. या सेलिब्रिटींच्या नावाने सर्च केल्यास प्रियंका चोप्राच्या नावाने सर्वाधिक म्हणजेच ७९ इंन्फेकटेड वेबसाइटस सापडतात, तर शाहरूखच्या ७५ आणि ६८ इंन्फेकटेड वेबसाइटस सापडतात सलमानच्या नावाने सर्च केल तर.
यादीच्या शेवटी फरहान अख्तर,अनिल कपूर,आणि बिग बी यांचा क्रमांक आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 21:43