प्रियांका चोप्रा बनली `बदमाश बबली`! Priyanka Chopra turns Badmaash Babli for ‘Shootout at Wadala’

प्रियांका चोप्रा बनली `बदमाश बबली`!

प्रियांका चोप्रा बनली `बदमाश बबली`!
www.24taas.com, मुंबई

संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट ऍट वडाळा’ सिनेमामध्ये आयटम साँगमध्ये प्रियांका चोप्रा ठुमके लगावताना दिसणार आहे. मात्र, आयटम साँगसाठी आपला होकर कळवण्यापूर्वी प्रियांकाने या आयटम साँगमध्ये काही अश्लीलता नाही ना, हे तपासून पाहिलं.

संजय गुप्ताने ट्विट केलं आहे, “मित्रांनो, ती प्रियांकाच आहे. सिनेमातल्या धमाल रेट्रो- ‘बबली बदमाश है’ या गाण्यावर ती नाचणार आहे. या गाण्याचं संगीत अनु मलिकने दिलं आहे. ”

त्यापूर्वी तिला तीन गाणी ऐकवण्यात आली होती. त्यातल्या ‘बबली बदमाश है’ गाण्यासाठी तिने होकार दिला. अनु मलिकने संगीत दिलेलं हे गाणं सुनिधी चौहानने गायलं आहे. हे गाणं जेव्हा प्रियांकाने पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा हे गाणं आर.डी. बर्मन यांनी फिरोझ खानसाठी तयार केल्यासारखं तिला वाटलं. यात ग्लॅमर पुरेपुर आहे, पण अश्लीलता नाही.

१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शूट आऊट ऍट वडाळा’ या सिनेमात जॉन आब्रहम, अनिल कपूर, कंगना राणावत, सोनू सूद, मनोज वाजपेयी आणि तुषार कपूर आहे.

First Published: Tuesday, February 19, 2013, 20:29


comments powered by Disqus