बलात्काराला फक्त पुरूषच जबाबदार - प्रियंका चोप्रा, Priyanka Chopra Tweet on gang Rape

बलात्काराला फक्त पुरूषच जबाबदार - प्रियंका चोप्रा

बलात्काराला फक्त पुरूषच जबाबदार - प्रियंका चोप्रा
www.24taas.com, मुंबई

महिलेने तोकडे कपडे घातले, किंवा एकटं फिरलं याला दोष देण्यापेक्षा पुरूष तरूणीचा असाह्यपणा पाहून बलात्कार करतात. त्यामुळे त्याला फक्त पुरूषच जबाबदार असतात. असं म्हणणं आहे ते अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचं. एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, याला तिचे तोकडे कपडे किंवा रात्रीबेरात्री एकटे फिरणे कारणीभूत नसते तर पुरुष तिच्यावर बलात्कार करतो हेच त्याचे कारण आहे.

नवी दिल्ली येथे धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करताना प्रियंकाने हा फक्त महिलांविरोधात नव्हे तर समाजाविरोधातील गुन्हा असल्याचे म्हटले.

आपल्याच देशात एकट्याने बसप्रवास करणारी महिला सुरक्षित नाही, ही धक्कादायक बाब असल्याचे प्रियंकाने ट्विटरवर म्हटले आहे.

First Published: Thursday, December 20, 2012, 13:16


comments powered by Disqus