प्रियांका चोप्राचे ठुमके ७ कोटींना, थर्टी फस्ट,Priyanka coprace thumake 7 crore hit the Thirty First

प्रियांका चोप्राचे ठुमके ७ कोटींना, थर्टी फस्टचा जलवा

प्रियांका चोप्राचे ठुमके ७ कोटींना, थर्टी फस्टचा जलवा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या प्रियांका तिच्या अदाकारीने चाहत्याना चांगलीच भूरळ घालते आहे. त्यामुळे तिच्या एका ठुमख्याची किंमत साधारण कोटीच्या घरात आहे. चेन्नईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमात प्रियांकाने सात मिनिटांसाठी सहा कोटी रूपयांची डिमांड केलेय, बरं का?

चेन्नईत ३१ डिसेंबरच्या रात्री आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात आपल्या सात मिनिटाच्या शोमध्ये प्रियांकाने सहा कोटी रुपयाची मागणी केली आहे. या कार्यक्रमाचे आयोजकांनी प्रियांकाला सहा कोटींची रक्कम देण्यासाठी तयारही झाले आहेत. दरवर्षी प्रियांकाची वाढती लोकप्रियता बघून तिला आपल्या कार्यक्रमात आणण्याचे आयोजकांनी ठरवले आहे.

सूत्रांच्या महितीनुसार आयोजक या शोमध्ये तिकटाच्या होणाऱ्या कमाई बघून प्रियांकाला पाहिजे ती रक्कम देण्यास तयार झाले आहेत. या कार्यक्रमात आयोजकांबरोबर मार्केटिंग टीमनेही या कार्यक्रमाचे प्रमोशन अधीच सुरु केले आहे. प्रियांका ही ‘क्रिश ३’ मध्ये नुकतीच झळकली होती.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 15:52


comments powered by Disqus