`क्वीन`चा `गुलाब गँग`ला दे धक्का ‘Queen’ Dominates Over ‘Gulaab Gang’

`क्वीन`चा `गुलाब गँग`ला दे धक्का

`क्वीन`चा `गुलाब गँग`ला दे धक्का
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माधुरी दीक्षित आणि जुही चावला सारख्या बड्या अभिनेत्रींनी साकारलेल्या `गुलाब गँग`ला कंगना राणावतच्या `क्वीन`ने मागे टाकलं आहे.

क्वीन आणि गुलाब गँग हे चित्रपट ७ मार्च रोजी रिलीज झाले होते. मात्र गुलाब गँग पेक्षा `क्वीन`ने जास्त गल्ला जमवला आहे.

तसेच चित्रपट समिक्षकांकडून `गुलाब गँग`च्या मानाने `क्वीन`चं जास्त कौतुक होत असल्याने, प्रेक्षकांनीही `गुलाब गँग`पेक्षा `क्वीन`ला महत्व दिलंय.

`गुलाब गँग`ला रिलीज होण्याआधीच वादात आला होता. गुलाब गँग आणि `क्वीन`च्या पटकथा या वेगवेगळ्या विषयांवर आधारीत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014, 09:18


comments powered by Disqus