Last Updated: Tuesday, March 25, 2014, 10:45
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबईनुकतंच अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थीनीनं सनी लिऑनच्या गाण्यावर वाईट पद्धतीनं नाचून व्हिडिओ बनवला. तिनं नुसता व्हिडिओ बनवलाच नाही तर तो व्हिडिओ यूट्युबवर प्रसिद्ध केलाय. त्याला चांगल्या हिट्सही मिळातायेत. कारण लहान बजेट असलेला चित्रपट `रागिनी एमएमएस २` बॉक्स ऑफिसवर चांगला चालतोय. आतापर्यंत चित्रपटानं २४.५ कोटींची कमाई केलीय.
चित्रपट ट्रेड विश्लेषक करण आदर्श यांनी हे ट्विट करुन सांगितलंय. या चित्रपटानं शुक्रवारी ८.४३, शनिवारी ७.२९ आणि रविवारी ८.७८ कोटी रुपयांची कमाई केलीय. अजून बॉक्स ऑफिसच्या बाकी चित्रपटांची आकडेवारी आली नाहीय.
कंगना रानावतचा `क्वीन` अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कमाई जवळपास ४७ कोटी रुपयांवर पोहचलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 10:45