Last Updated: Thursday, January 24, 2013, 14:21
www.24taas.com, मुंबईजिस्म-२ मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर पॉर्न स्टार सनी लियॉन रागिनी एमएमएस-२ ची शुटींग सुरू केली आहे. ज्यात सनी लियॉन बॉलिवूडच्या अभिनेत्रीची भुमिका करते आहे.
रियालिटी शो बिग बॉसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लियॉन पूजा भट्टचा सिनेमा जिस्म- २ मध्ये काम केलं आहे. जरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. रागिनी एमएमएस-२ हा सिनेमा गूढ असा आहे, ज्यात सनी लियॉनकडून बरीच आशा आहे.
या सिनेमात सनी लियॉन बॉलिवूडमधील अभिनेत्रीच्या भूमिकेत असल्याचे समजते. काही दिवसापूर्वीच सनी लियॉनच्या ह्या सिनेमाचं शुटींग सुरू झालं असल्याचं समजते. रागिनी एमएमएस-२ ची निर्माती एकता कपूर हिने ह्या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा दिल्लीतील सत्य घटनेवर आधारित आहे. एका तरूणीचा एमएमएस बनविला गेला आणि त्यातून निर्माण झालं गूढ नाट्य यावर हा सिनेमा आहे.
First Published: Thursday, January 24, 2013, 14:15