रागिनी MMS2 - सनीच्या सेक्सी अंदाजाचा भयपट,‘Ragini MMS 2’ quick review

फिल्म रिव्ह्यू रागिनी MMS2 सनीच्या सेक्सी अंदाजाचा भयपट

फिल्म रिव्ह्यू रागिनी MMS2 सनीच्या सेक्सी अंदाजाचा भयपट

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकता कपूरची बहुचर्चित चित्रपट रागिनी एमएमएस-२ शुक्रवारी रिलीज झाला. हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झालेल्या रागिनी एमएमएसचा सिक्वल आहे. या चित्रपटात नवीन काही नाही, पण हॉट आणि बोल्ड सीन्सचा भडीमार आहे. या चित्रपटाची काहणी मागील चित्रपटाच्या काहणीवरून पुढे सरकते. पाच वर्षांनंतर रागिनी पुन्हा आली आहे सनी लिऑनच्या रुपात....

काय आहे काहणी
पॉर्न स्टारने अभिनेत्री बनलेली सनी लिऑन हिने एका चेटकीणीची भूमिका वठवली आहे. मागील चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच या चित्रपटाची सुरूवात केली आहे. चित्रपटाची काहणी यंग कपल रागिनी आणि उदय यांच्या आसपास फिरणारी आहे. हे दोघे एका सुनसान घरात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेले असतात. परंतु त्यावेळी असते काही होते, की त्यामुळे या दोघांचे आयुष्य बदलून जाते. उदय एकीकडे मरण पावतो, तर दुसरीकडे रागिनी वेडी होते.

ज्या घरात ते जातात त्या घरात एक चेडकीण असते. तीला काय हवे आहे आणि रागिनीला का त्रास देत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा चित्रपट तुम्हांला पाहावा लागेल. चित्रपटाची काहणी अशा प्रकारे मांडण्यात आली की प्रेक्षक बांधलेला राहतो. चित्रपटात गती आहे त्यामुळे तो चांगल्या गतीने पुढे सरकत असतो. परंतु यातील काही सीन्स प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत.

कसा झाला अभिनय
एक गोष्ट खरी आहे की सनी लिऑनने आपल्या मादक आणि उत्तेजक रुपात दाखविण्यात आले आहे. जिस्म -२ पेक्षा सनी लिऑनची यात चांगली भूमिका आहे. पण चित्रपट पटकथेसह काही बाबती कमी पडलेला दिसला आहे. या चित्रपटात सनी लिऑनने बोल्डनेसचा तडका लावला असला तरी अभिनय थोडाफार जमला आहे. या चित्रपटात ती जिस्म-२ पेक्षा अधिक सुंदर दिसली आहे, तसेच संवादफेक आणि अभिनय अधिक खुलला आहे.

गाण्यांची धम्माल
या चित्रपटातील संगीत आणि गीते या पूर्वीच हीट झाले आहेत. बेबी डॉल आणि चार बोतल वोडका हे दोन गाणे चांगल्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहेत. या गाण्यातच प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला आहे. यो यो हनी सिंग याचे चार बोतल वोडका या गाण्यात सनी लिऑन खूप ढासू दिसली आहे. सनी लिऑन बेबी डॉलच्या डान्स स्टेपमध्ये खूपच चांगली दिली आहे.

सस्पेन्स, थ्रील आणि रोमांच्या कसोटीवर आधारित हा चित्रपट साधारण वाटतो. पण चित्रपट आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात धरून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. सनी लिऑनच्या चाहत्यांना हा चित्रपट निराश करणार नाही. सनीचा बोल्डनेस, कामुक अदा आणि अभिनयही प्रेक्षकांना चांगली मेजवानी आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 19:25


comments powered by Disqus